श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव,दि.१७/०१/२०२३
राष्ट्रीय सरपंच संघ यांच्या वतीने राष्ट्रीय सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश राज्यकार्यकारीनी व राज्य स्तरीय सरपंच परिषद व नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष जयराम पलसानिया यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली रविवारी 15 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. यात चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नागभिड तालुक्यातील वाढोना येथील सरपंच देवेंद्र गेडाम यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयराम पलसानिया (राजस्थान) आदित्य उपाध्याय राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्ष (छत्तीसगड) मुकेश साकिया राष्ट्रीय महासचिव (गुजरात) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद सांगोले व राहुल उके राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मागील दोन वर्षामध्ये सरपंच उपसरपंच व सदस्य यांना एकञ आनत व गावातील समस्या सरकार दप्तरी पोहचविण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील मागील पथदिवा विद्युत स्ट्रिट लाईट आंदोलन व 20 पेक्षा कमी पटसंखेच्या जिल्हा परिषद च्या शाळा बंद करण्याचे आदोंलन यांमध्ये श्री देवेंद्र गेडाम यांनी प्रमुख नेतुत्व केले होते त्यांच्या नेतृत्वाची व कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हा चंद्रपुर च्या जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली व उपस्थित सर्व राष्ट्रीय कार्यकारिनीच्या हस्ते नियुक्ती पञ देवुन निवड करण्यात आली.