टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 मध्ये सरपंच ॲड. शर्मिला रामटेके यांचा सहभाग

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

सावरगाव.दि.१४/०१/२०२३

गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आर एस सी डी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारी इशाद या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 आयोजित करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातील पंचायत मधील वीस महिला नेतृत्व सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून ॲड. शर्मिला रामटेके या नवेगाव पांडवच्या सरपंच यांची निवड करण्यात आलेली आहे.
मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या या महिला सरपंचाचा अनुभव महाराष्ट्रातील अन्य महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रेरणादायी असेल. लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्याचे निवृत्त मुख्य सचिव व माजी राज्य निवडणूक आयुक्त ज स घगरिया यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभत आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून महिला सरपंच संपन्न अशा अनुभवाची शिदोरी आपापल्या गावात घेऊन जातील असा आशीर्वाद आयोजकांनी व्यक्त केला आहे.