वडसा ब्रम्हपुरी बायपास रस्ता तत्काळ सुरू करा- समाजवादी पार्टी जिल्हा सचिव फैजान पटेल

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर  

देसाईगंज,दि.१४/०१/२०२३

देसाईगंज शहरातून ब्रम्हपुरी रोड कडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची अत्यंत भयानक दुर्दशा झाली होती सदर बायपास रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी समाजवादी पक्षाने रेठुन धरली होती नगर पालिका देसाईगंज नें दखल घेत सदर रस्त्याचे बांधकाम सुरू केले परंतू सदर रस्त्यावरील जड वाहतूक ही देसाईगंज येथील कमलानगर येथून वळवळविण्यात आले परंतू जड वाहतुकीच्या आवागमनाणे कमला नगर येथील रस्ते पूर्ण तहां फुटले रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत़ दर रोज याच रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत़ सदर कमला नगर येथुन सुरू असलेली जड वाहतूक बंद करावी आणि सदर अर्धवट बनून तयार झालेला वडसा wadsa   ब्रम्हपुरी Bramhapuri  बायपास रस्ता तत्काळ सुरू करावा अशी मागणी आज समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा सचिव फैजान पटेल यांच्या नैत्रूत्वात नीवेदनातुन देसाईगंज नगर पालिका मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्या कडे करण्यात आली आहें सदर निवेदन देतांना अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष खलील खान आणि देसाईगंज येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.