श्री नंदकिशोर वैरागडे, विशेष प्रतिनिधी,गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर
कोरची,दि.१२/०१/२०२३
पोलीस स्टेशनच्या बैठकीला उपस्थित राहून परतीच्या मार्गावर असलेल्या पड्यालजोब येथील पोलीस पाटलाचा 9 जानेवारीला झालेल्या अपघाता नंतर उपचारादरम्यान नागपूर येथे आज मृत्यू झाल्याची घटना घडली असून पुनाराम पोरेटी वय 50 असे मृत्यू पोलीस पाटलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीवरुन पुनाराम पोरेटी हे कोरची पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या बैठकीला उपस्थित राहून स्वतःच्या मोटारसायकलने सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान परतीच्या मार्गावर असताना कोरचीवरून चार किमी अंतरावर असलेल्या बोडेणा जवळ मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने जखमी झाले होते. अपघाताची माहिती 108 रुग्णवाहिकेला देण्यात आली. त्यांना उपचारासाठी कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याने गडचिरोली वरुन नागपूर हलविण्यात आले पण आज नागपुरात येथे उपचारादरम्यान निधन झाले पोलीस पाटील हे कर्तव्यावर असताना अपघातात निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात असून प्रेमळ व स्वच्छ प्रतिमेच्या पोलीस पाटलाचे निधन झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे. नागपूर मध्ये पोस्टमार्टम करून आज पडयालजोब येते अंत्यविधी करण्यात आला.