श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.१२/०१/२०२३
“हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या. राजमाता जिजाऊं म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तत्व या तीन गुणांचा सुरेख संगम साधत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते.” असे प्रतिपादन डॉ. डॉ शंकर कुकरेजा यांनी केले. ते स्थानिक आदर्श महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “स्वामी विवेकानंद एक महान विचारवंत आणि हिंदू नेते होते ज्यांनी भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा जगभरात प्रसार केला.” असे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपली संस्कृती जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.”
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयदेव देशमुख यांनीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सर्व प्रथम जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. हितेंद्र धोटे यांनी तर व उपस्थितांचे आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.