विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा सर्वधर्मियांच्या उपस्थितीत सपन्न

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

घुग्घूस,दि.०३/०२/२०२३

घुग्घूस येथे भव्य संविधान रैल्लीचे आयोजन करण्यात आले होते या रैल्लीमध्ये नागपूर दिक्षाभूमीचे अध्यक्ष पूज्य.भन्ते बुद्ध सुरई ससाई, बुद्ध शरन, व यांचा भिखू संघ यांच्या उपस्थितीत हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या सर्व धर्मियाचे लोक व प्रमुख लोक आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करीत रैल्ली मध्ये सहभाग घेतला होता.हीरॅली वियानी विद्या मंदिर शाळेपासून सुरु होऊन गुरुद्वारा जवळून शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन पासून नगरपरिषद मार्गे समता वाचनालय, गांधी चौक, जामा मस्जिद, बँक ऑफ इंडिया मार्गे निघून नवबौद्ध स्मारक समिती परिसर( नायब तहसील कार्यालय) परिसरात समाप्त करण्यात आली.सायंकाळी 5 वाजता उपस्थित सर्व मान्यवराचे हस्ते सामूहिकरित्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठया थाटामाटात व भव्य स्वरूपात करण्यात आले. यावेळी हजारोचे संख्येनी लोक उपस्थित होते. Dr.babasaheb Ambedkar Statue At Ghuggus

नवबौध्द स्मारक समिती तथा बहूउदेशिय संस्थेद्वारा स्थापित भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, दिक्षाभुमी नागपूर चे अध्यक्ष भन्ते बुद्ध नागार्जुन सुरई ससाई, बुद्ध शरण व यांचा भिखू संघ,जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोरा -भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, रामचंद्र चंदनखेडे, राहुल पुगलीया, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे सर्व विहार समिती, युवक मंडळ, जयभीम युवा मोर्चा व सामूहिक सर्व धार्मियाचे लोक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. News Jagar

याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ.जोरगेवार हे संबोधित करीत असताना माजी खासदार नरेश पुगलिया यांनी समाजमंदिर,अभ्यासिका व इतर सोयीसाठी आमदार फंड व खनिज निधीतून मदत करण्याची विनंती केली असता पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पाहिजे तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले तर आ. जोरगेवार यांनी बजेटमध्ये तरतूद करून फंड देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मंचावर गजानन गावंडे, पुष्कर चौधरी, देवेद्र गहलोत, राहुल पावडे, दिनेश चोखारे, सिद्धार्थ पथाडे, मुरली चिंतलवार उपस्थित होते.

प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान,संविधानासमोरील आव्हाने, देशाची आजची परिस्थिती, भारतीय महिलांची परिस्थिती,ओबीसी समाजाची स्थिती या विषयावर डॉ. अभिलाषा गावतुरे,प्रा. जावेद पाशा, सौ.वंदनाताई बोबडे,अनुताई दहेगावकर,कविता अलोणे,बौद्धी फॉउंडेशनच्या कोषाध्यक्षा अर्चना खोब्रागडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सपना महेश कुंभारे यांनी आपले प्रेरक विचार मांडले.तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संस्कृती बोढेवार या बालिकेने मी रमाई हे एकपात्री नाटक सादर केले.
दीपक पेंदोर यांच्या बिरसा कन्या ग्रुपने मनमोहक आदिवासी नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर अश्विनी खोब्रागडे व त्यांच्या ग्रुपने फुले, शाहू, आंबेडकरी प्रबोधन पर गाणे प्रस्तुत करून प्रेक्षकांना नाचण्यास प्रेरित केले.यावेळी महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचेही सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा झाडे,वैशाली भालशंकर, शारदा फुलझेले, छाया पाटील,कवडू खैरे, वामण पाझारे, सागर डांगे,मनोज पाटील, दीपक कांबळे,दिनेश घागरगुंडे, पवन आगदरी,आकाश गोरघाटे, आनंद निखाडे,गोपाल चुनारकर, प्रविण मुन,भारत जीवणे, मनोहर कवाडे, नागेश पथाडे,सर्व महिला मंडळ,युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील सर्व नागरिक व व्यापारी वर्गाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमेंद्र कांबळे तर आभार प्रदर्शन अशोक रामटेके यांनी केले.