देसाईगंजातील ज्येष्ठ पत्रकार प्रभातकुमार दुबे यांचे निधन

Prabhatkumar-Dubeji-The-Dynamic-Reporter
Prabhatkumar-Dubeji-The-Dynamic-Reporter

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.०३/०२/२०२३

देसाईगंज तालुक्यातील पत्रकारी क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन प्रशासनाची वाचा फोडणारे देसाईगंज येथील ज्येष्ठ पत्रकार, संपादक, तथा प्रेस क्लब अध्यक्ष श्री. प्रभातकुमार दुबे यांच्या निधनाने फार मोठी शोककळा निर्माण झाली आहे. prabhatkumar Dube is no more 

पत्रकारिता क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक, प्रेस क्लब अध्यक्ष श्री.प्रभातकुमार दुबे यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक हरपला, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रभातकुमार दुबे यांना पत्रकारिता क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिकचा दांडगा अनुभव होता. त्यांनी विविध वर्तमानपत्रात काम केले होते. सध्या ते देसाईगंज येथून निघणारे अर्धसाप्ताहीक त्रिकालनेत्र वा वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
राजकीय, सामाजिक आणि विविध संघटना क्षेत्रांतील मान्यवरांनी दुबे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने देसाईगंज शहराच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दुबे यांची पत्रकारिता मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील ३५ वर्षाहून अधिक वाटचालीत त्यांनी जिल्ह्यातीलच नाही तर तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. त्यांचं निधन ही देसाईगंजाच्या पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी आहे. News Jagar
ही हानी कधीही भरुन न निघणारी आहे. दुबे यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचं सावट पसरलेला आहे.
त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले, सूना, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ३ फेब्रुवारी ला दुपारच्या वेळेस वैनगंगा नदिघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने देसाईगंज शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात, पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.