नागभीड
श्री.अरुण बारसागडे तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
नागभीड तालुक्यातील वाढोणा ग्राम पंचायत ने पंतप्रधान मंञी आवास योजना , रमाई आवास योजनेत जास्तीतजास्त गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले त्यामुळे ग्रामपंचायत वाढोणा गावात नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करून घेतली. त्यामुळे तालुक्यात प्रथम क्रमांकाची सर्वातउत्कृष्ठ ग्राम पंचायत म्हणून वाढोणा ची निवड करण्यात आली असून, महाआवस अभियान ग्रामीण २.० या योजनेत सुद्धा तालुक्यातून पहिला येण्याचा बहूमान सुद्धा ग्राम पंचायत ला मिळाला आहे.
घरकुल योजनेमध्ये प्रतिलाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. चार टप्प्यातील अनुदान तत्काळ मिळवीत योजनेचे काम प्रभावीपणे राबविले आहे, त्यामुळे तालुक्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत महाआवास पुरस्कारात वाढोणा ग्राम पंचायत चा प्रथम क्रमांक आला. तसेच या योजनेतून उत्कृष्ट पद्धतीने घर श्री तुलशीदार येसनसुरे यांनी बांधले त्यामुळे त्यांना सुध्दा तालुक्यातील सर्वात्कृष्ठ बांधकामासाठी तिसऱ्या क्रमाकाचे पुरस्कार देण्यात आला. अशी माहिती सरपंच देवेंद्र गेडाम यांनी दिली.
तालुक्यात प्रथम पुरस्कार मा गटविकास अधीकरी मा. प्रणाली खोचरे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात आज देण्यात आले, यावेळी प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी मा. अरुण घाटोळे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. चिलबुले साहेब, विस्तार अधिकारी पंचायत मा. श्वेता राऊत तसेच तालुक्यातील अनेक ग्राम पंचायत चे सरपंच, ग्रामसेवक , व घरकुल लाभार्थी मोळ्या संख्येने उपस्थित होते.
महा आवास 2.0 योजनेत प्रधानमंञी ग्रामिण आवास योजनेत मागील वर्षात ग्राम पंचायत अंतर्गत २४७ घरकुल मंजूर करण्यात आले होते,तर रमाई आवास योजनेत ३१ घरकुल मंजूर करण्यात आले.
नागभीड तालुक्यात महाआवास 2.0 योजनेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वाढोणा ग्रामपंचायतीला मिळाल्याबद्दल ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चे अभिनंदन करण्यात आले आहे.