पूर परिस्थितीचा अंदाज घेता ग्रामीण भागातील गर्भवती महिलाना रुग्णालयात केले दाखल (ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ सुविधा) ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- सध्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. ग्रामीण भागातील पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन गर्भवती महिला रुग्णांच्या मदतीला धावून आले . सध्या राज्यात सर्वत्र पुरजन्य परिस्थिती आहे .व अशावेळी कठीणकाळी आपले ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी हे आजही तेवढ्याच ताकतीने रुग्णांच्या सेवेत असताना दिसून येत आहे. सध्या रुग्णालयामध्ये गर्भवती महिला ज्यांची प्रसूती 15-20 दिवसांनी आहे. तालुक्यातील कसरला, खेड, बोडेगाव,बेटाळा,पारडगाव,जुगणाळा,नवेगाव, नांदगाव(जाणी),चांदली, बरडकीन्ही,पिंपळगांव,एकारा,कीन्ही,गणेश पूर, चौगान,चकबोथली, व बाहेर तालुक्यातील गर्भवती 25-30 गर्भवती महिला आज रुग्णालयात दाखल केलेल्या आहेत .जेणेकरून कुठलीही परिस्थिती तयार झाल्यास योग्य उपचार मिळावा. ब्रम्हपुरी रुग्णालयात सध्या पावसाने थैमान घातले आहे. पुराने दोन-चार दिवसाने पूर परिस्थिती निर्माण होत आहे. अश्या काळात रोज रुगांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच्या योग्य प्रकारे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उपचार करीत आहेत .नेहमीच रुग्णांच्या सेवेत असणारे रुग्णालय आज मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम खंडाळे सर,डाँ. पटले, डाँ. नागमोती, डाँ. जीवने, डाँ. शेख, डाँ. खरकाटे,डाँ. मेंढे, तसेच संपूर्ण वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर ,नर्सेस व संपूर्ण आरोग्य कर्मचारी हे मानसिक व शारीरिक सेवेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. आज सर्व रुग्ण व नातेवाईक या सेवेबद्दल रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे आभार व समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. रुग्णालयाच्या संपूर्ण टीमच्या कार्याला सलाम.