लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे स्वातंत्र दिन साजरा

स्थानिक लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे दि. 15 ऑगस्ट 2022 ला 75 वा अमृत महोत्सवी स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला. विदयालयातून एसएससी परीक्षेत प्रथम येणारा विदयार्थी सुरज सदाशिव खोब्रागडे हया विदयार्थ्याच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयात स्वातंत्राच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम विदयालयात घेण्यात आले. चित्रकला स्पर्धा , पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, सामुहीक देशभक्ती गीत स्पर्धा, गित गायन स्पर्धा, कथा कथन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच विदयालयातील शिक्षक वर्गातर्फे गाथा क्रांतीकारकांची हा उपक्रम राबविण्यात आला.
सर्व उपक्रम प्राचार्य श्री विलास धोंगडे सर, उपप्राचार्य श्री रवि पेशटटीवार सर , पर्यवेक्षिका सौ प्राजक्ता चिंचाळकर मॅडम, इ. अधिकारी वर्गांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले व शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.