Home चंद्रपूर रक्षाबंधन निमित्त उश्राळ मेंढा येथील कुटुंबांना झाडे भेट
- रक्षाबंधन निमित्त उश्राळ मेंढा येथील कुटुंबांना झाडे भेटसावरगाव /- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ही फक्त काव्यपंक्ती न ठेवता ती प्रत्यक्षात अमलात आणण्याच्या काम नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंढा येथील लोकनियुक्त सरपंच श्री हेमराज लांजेवार यांनी प्रत्यक्षात अमलात आणण्याचा काम त्यांनी केलेला आहे.
रक्षाबंधन हे सुंदर औचित्य साधून जसे रक्षाबंधन निमित्त जशी बहीण भावाला ओवाळून राखी बांधते व त्याच बंधनाचे उपकार म्हणून भाऊ बहिणीचे संरक्षण करीत असते व सांभाळ करीत असते. नेमके हेच औचित्य साधून लावलेले झाडे यांचे संरक्षण करीता यावे त्यांना पण आपल्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे जपता यावे व झाडाचे योग्य पद्धतीने संगोपन करता यावे यासाठी उश्राळ मेंढा येथील लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार यांनी गावातील कुटुंबांना प्रत्येकी एक झाड रक्षाबंधन निमित्ताने भेट देण्यात आले व तसेच दिलेल्या झाडाचे संगोपन करण्याचे आव्हान पण गावातील नागरिकांना करण्यात आले आहे.
गावामध्ये झाड वाटप करतांना लोकनियुक्त सरपंच श्री. हेमराज लांजेवार व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कृपया बातमी कॉपी करू नका । शेअर करा, धन्यवाद !