जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण*

*जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
*- विज, रस्ते, शिक्षण व आरोग्य यात जिल्ह्याची भरीव कामगिरी*
*- जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 75 फुट उंच ध्वजाची उभारणी*
सविस्तर वृत्त
— जिल्हा निर्मिती पासून आज पर्यत गडचिरोली जिल्ह्यात विज, रस्ते, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून भविष्यात सुध्दा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात या सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येईल याबाबत प्रशासन काम करीत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापण दिनानिमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील आदरणीय ज्येष्ठ नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा संदेशात त्यांनी या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व असून आज आपण सर्व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राष्ट्रीय एकता व अखंडता अधिक मजबुत होऊन एकीकृत भारताच्या मूल्याचे संवर्धन व्हावे यासाठी ज्यानी आपले योगदान दिले त्याच्या योगदानाला नमन असल्याचे आठवण काढत त्याच्या विचारांना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांनी अखंड भारतासाठी आपणही योगदान देण्यासाठी आज संकल्प करूया असे आवाहन केले. या ध्वजारोहण प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डा. देवराव होळी, पोलिस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आर्शिवाद, तसेच अन्य मान्यवार उपस्थित होते. यावेळी पोलिस दल, महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
*गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच 75 फुट उंच ध्वजाची उभारणी* जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन समोर करण्यात आली. या ठिकाणचा ध्वज मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी संजय मीणा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वरती घेण्यात आला. ध्वज उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अभियंतानी तातडीने काम पूर्ण करून ध्वजाची उभारणी केली.