श्री.अरुण बारसागडे नागभीड तालुका प्रतिनिधी न्युज जागर
नागभीड तालुक्यातील सोनुली (बुज )येते तान्हा पोळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रमोद गायकवाड माजी सरपंच तथा सदस्य ग्रा. पं. सोनुली (बुज.), प्रमुख पाहुणे सौ. मंजुषा मस्के सरपंच, नेताजी शेंडे उपसरपंच, प्रमोद पुस्तोडे अध्यक्ष तंमुस, नंदुजी लोधे पो. पा.,राकेश गायकवाड सर, सागर मदनकर पोष्ट मास्तर,युवराज सुकारे, अरविंद गायकवाड, टेमदेव मडावी, पुंडलिक आळे, सुनिल मडावी,एकनाथ पुस्तोडे,श्रीकृष्ण मस्के, पुरुषोत्तम बोरकर,ग्रा.पं.चे सदस्य विठ्ठलजी उईके, सौ. आशा आळे, सौ. उर्मिला नान्हे, सौ. आशा मांढरे गावकरी मंडळी, बालगोपाल उपस्थित होते. यावेळी उपस्थित नंदीबैल मधुन प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ तसेच वेशभूषा मधुन प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ बक्षीस प्रदान करण्यात आले, तसेच सर्व नंदीबैल आणलेल्या व वेशभूषा केलेल्या सर्व बालगोपालांना सुध्दा प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोशन मस्के तर उपस्थितांचे आभार रेशिम मस्के ग्रामरोजगार सेवक यांनी मानले आणि प्रसाद वाटप करुन तान्हा पोळा उत्सव समाप्त झाला.