श्री.अरुण बारसागडे न्यूज जागर नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेली गट ग्रामपंचायत आलेवाही येथे सर्वसाधारण सभा घेऊन त्या मध्ये गावात ‘महात्मा गांधी तंटामुक्त समिती’ ची स्थापना करण्यात आली. या वेळी नेपाल नामदेव राऊत यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती’अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सचिव/निमंत्रक म्हणून पृथ्वीराज बंसोड पो. पाटील यांची व सदस्य मध्ये सौ. योगीता दयानंद सुरपाम, रामदिन नान्हे, निलकंठ नन्हेबोईनवार, सौ.लता लाडे, सौ.अंजुम रहमान शेख, सौ. अल्का दिघोरे, सौ.चंद्रभागा बोरकर, एकूण महिला व पुरुष, अशा 32 सदस्यांची तंटामुक्ती समिती मध्ये निवड करण्यात आली.
सदर सभा सरपंच सौ.योगीता सुरपाम, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत चे सचिव कामेश वानखेडे, पोलीस पाटील पृथ्वीराज बंसोड, व या सभेला गट ग्रामपंचायत मधील आलेवाही, जिवनापूर , टोला, हस्तानपूर , खरकाळा, येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे मधूनच गांवाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती’ च्या अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.