तब्बल 8 महिने नागरिक होते अंधारात
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्युज जागर
नेहमी भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या विद्युत विभागाने नवीनच विक्रम केले असून कोरची तालुक्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या मयालघाट येथील विद्युत पुरवठा एक-दोन दिवस नाही तर तब्बल 8 महिने बंद अवस्थेत होते. या गावातील चार खांब हे जर्जर अवस्थेत झाले असून याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.
मयालघाट हे 8 महिन्यापासून अंधारात असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होताच दुसऱ्याच दिवशी येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात परिसरात नेहमी विषारी जीवजंतूचा संचार बघितला जातो व या दिवसात डासांचे प्रमाण सुद्धा वाढत असते अशात मलेरियाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस 8 महिने अंधारात काढणे म्हणजे या डिजिटल युगात किती भयावह असेल हे शब्दात स्पष्ट करणे अवघडच. मुख्य म्हणजे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मयालघाट येथील गावकऱ्यांनी कित्येकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या, निवेदन दिले परंतु नेहमीप्रमाणे त्यांना दुर्लक्षित करण्यात आले.
गांभीर्याची बाब म्हणजे या गावातील नागरिक 8 महिन्यापासून अंधारात असून सुद्धा त्यांना महिन्याला बिल येत होते व जुलै महिन्याचे बिल मध्ये तर त्यांनी वीज वापरल्याचे सुद्धा बिल असल्यामुळे मयालघाट येथील गावातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व मनात गोंधळ निर्माण झाली असल्याचे दिसून आले. म्हणजे महिन्याला येणारे बिल हे खरंच पारदर्शकपणे पाठविले जातात का? याच्यात सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तालुक्यात मागील चार ते पाच वर्षापासून विद्युत विभागाचा पूर्ण खेळखंडोबा झालेला असल्याचे दिसून येत आहे. तरी याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी मयालघाट वासीयांनी केली आहे.
कृपया बातमी कॉपी करू नका । शेअर करा, धन्यवाद !