वैद्यकीय शिक्षण परीक्षेत (नीट) अपयशाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांची आत्महत्या

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्युज  जागर

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथील हर्षद सदू तलांडे(१८) या विध्यार्थ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली.
बारावी उत्तीर्ण झाल्यावर २०२१ ला वैधकिय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. त्याचा नीट परीक्षा देण्याचा हा दुसरा प्रयत्न होता.यावर्षी जुलै मध्ये नीट परीक्षा दिल्यावर १९ ऑगस्टला तो नागपूरहून घरी परतला. कमी गुण मिळतील या भीतीमुळे त्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले.

सदर बाब घरच्यांच्या लक्षात येताच तातडीने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथे हलविण्यात आले.पण उपचारा दरम्यान बुधवारी पहाटे हर्षदचे दुःखद निधन झाले.

मृत विध्यार्थ्याचे वडील शिक्षक असून आई ग्रामपंचायत सदस्य आहे.