श्री.अरुण बारसागडे , चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
सावरगाव,दि.१७/०२/२०२३
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शोभा किराणा दुकानात सुंगधीत इगल तंबाखू आणून विक्री करीत असल्याचे गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना माहिती होताच तळोधी बा. पोलीस यांच्या सहकार्याने सावरगाव येथील शोभा किराणा व्यावसायिक विनोद रामराव आंबोरकर वय ३५ वर्ष यांच्या घराची झडती घेतली असता घरासमोर असलेल्या तनसीच्या ढिगारा मध्ये पांढरे रंगाची नायलॉन चुंगळीत ४० पॉकेट इंगल तंबाखू किंमत १३६००रुपये, ६ पांढऱ्या रंगाच्या नायलॉन चुंगळीत ११० ईगल तंबाखू च्या पुढया प्रत्येकी ४० ग्रॅम किंमत ४६२००,५० पॉकेट होला सुंगधीत तंबाखू किंमत ८२००,व ९खोके मजा तंबाखू, प्रत्येक खोक्यात १०नग किंमत २१ १५० रुपये एकूण ९० डब्बे ५० ग्रॅम प्रमाणे किंमत ८९२५० रुपयांच्या माल जप्त करण्यात आल्याने स्थानिक गुन्हा शाखेचे सुरेंद्र राघो महतो यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर तंबाखू जनसामान्यांच्या जीवितास हानिकारक असताना माल बाळगून विक्री केली जात असल्याने सदर व्यावसायिक विनोद आंबोरकर vinod Amborkar sawargaon यांच्या विरोधात कलम १८८,२७३ भांदवी सहकलम २६(२) (१) ,डी,५९अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अगोदर सुध्दा तळोधी बा. पासून 2 किलोमीटर अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली होती. तसेच पुन्हा तळोधी बा. अप्पर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुंगधीत तंबाखू ची विक्री केली जात असल्याचे बोलले जाते आहे. या भागात मानवी जीवनास हानी करणारे व्यावसायिक यांच्या वर कारवाई करण्याची मागणी जनसामान्य वर्गातून केली जात आहे. News Jagar