श्री. विलास ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.१७/०२/२०२३
मानवी समाजाला शांती,प्रेम, अहिंसा, निसर्ग संवर्धन, अंधश्रद्धा, समाजातील वाईट रूढी,प्रथा, परंपरा, चालीरीती निर्मूलन करण्याचे संदेश देणारे थोर क्रांतिकारी जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात एस.आर.पी.एफ.कॅम्प, विसोरा ता. देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान.जांभुळकर साहेब, प्रमूख अथिती मान. मोतीलालजी कुकरेजा साहेब, मान. ज्ञानदेवजी परशुरामकर साहेब, मान. मनोज चव्हाण साहेब ए.सी.एफ,वडसा, मान. गाडेकर साहेब, मान. यकोनकर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी बंजारा समाजाचे कुल दैवत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचा पुजन करून संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून श्रद्धांजली अर्पण केली. जीवनात यशस्वी होण्याकरिता संताचे विचार आत्मसात करून समाजातील वाईट चालीरीतीना हद्दपार करून सर्व जाती जमाती लोक समाज हिताचे रक्षण व कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. NEWS JAGAR
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चव्हाण, सुञसंचालन प्रा. डॉ.विठ्ठल चव्हाण तर आभार मनोज चव्हाण यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक राठोड, संदीप पवार, जितेंद्र जाधव, नारायण आडे, गणेश चव्हाण, नरबिन जाधव, देवानंद चव्हाण, सुभाष चव्हाण, पंडित पवार, अंबादास राठोड, अनिल आडे, सुरेश राठोड, मधुकर राठोड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील महिला, पुरुष, व मुले बहुसंख्येने उपस्थित होते.