श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.१६/०२/२०२३
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पथविक्रेत्यांकरीता दिनांक 6 फेब्र्रु्रवारी ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यत “मै भी डिजीटल 4.0” मोहीम राबविण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार देसाईगंज नगरपरिषद च्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांकरीता “मै भी डिजीटल 4.0” कार्यक्रम व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME ( Pradhan Mantri Formalisation of Micro food Processing Enterprises ) अंतर्गत बीजभांडवलाच्या धनादेशाचे वितरण कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक नगर परिषद सभागृहात आयोजन करण्यात आले.
प्रथमत: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. मै भी डिजीटल 4.0 मोहीमेच्या माध्यमातुन पथविक्रेत्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन व्यवहार जसे मोबाईल बॅकीगचे व्यवहार, QR Code, UPI id, Google Pay, Phone Pay, Bhim App, Paytm ने व्यवहार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबाबत आय.डी.बी.आय.बॅकेचे शाखा व्यवस्थापक अमीत बोरकर यांनी मार्गदर्शन केले व या प्रसंगी पथविक्रेत्यांना शासनाकडून प्राप्त परिचय बोर्ड चे व QR Code चे वाटप करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME योजनेअंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील 7 महिला बचत गटांना मान्यवरांचे हस्ते बीज भांडवल निधीचे वितरण करण्यात आले व या योजनेबाबत बाबत सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे यांनी सविस्तर माहिती देऊन, या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिला बचत गट व वैयक्तीक लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.newsjagar
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यालय अधिक्षक श्री महेश गेडाम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय.डी.बी.आय.बॅकेचे शाखा व्यवस्थापक अमीत बोरकर, सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे तर अतिथी म्हणून नगर परिषदेचे रचना सहायक दानिशोद्दीन काजी, अभियंता मंगेश नाकाडे, शहर स्तर संघाच्या अध्यक्षा शोभाताई चांदेवार , सचिव कल्पना वासनिक, तेजोमय लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक कुंदा मामीडवार ई.मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समुदाय संघटक अरुण मोटघरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहयोगीनी आशा खरकाटे, सिंधूताई रामटेके यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास नगर पालिकेचे ईतर कर्मचारी वृंद व शहरातील पथविक्रेते, बचत गटातील महिला, वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघातील महिला पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.