श्री. विलास ढोरे , तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
आमदार कृष्णा गजबे यांनी घेतले लसीचा बूस्टर डोज
पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आमदार कृष्णा गजबे यांचे आवाहन.
कोविड लसीचे दोन डोज घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच ६० वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरी डोज घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यात येत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्ती, आरोग्यसेवक, फ्रन्टलाईन वर्कर यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहे. आज उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे जाऊन त्यांनी बूस्टर डोज घेतला. या प्रसंगी त्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना हे आवाहन केले आहे.