श्री. अनिल गुरनुले , तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर .
बोरी परिसरातील बकऱ्या जंगलात चारण्यासाठी गेले असता विषारी चारा खाल्ल्याने अठरा बकऱ्या दगावल्याने गावात खडबड उडाली.
दिनांक 08/09/2022 सकाळी नेहमीप्रमाणे बोरी परिसरातील बक-या चालणारा श्री महादेव मोहुर्ले यांनी गावक-याचे बकऱ्या घेऊन जंगलात चारण्यासाठी गेला असता, कंपार्टमेंट क्रमांक 592 मधिल वन तलावाजवळ बकऱ्या अचानक चक्कर येऊन खाली पडत होते.काय झाले काय नाही याला काही कळाले नाही. महादेवने गावाकडे धाव घेऊन बकऱ्या मरत आहेत. धावा धावा अशी आरडाओरड केली. त्यात गावकऱ्यांनी जंगलाचे दिशेने जाऊन बघताच बकऱ्या मृत्यू पडल्याचे दिसले त्याच क्षणी पशुवैद्यकीय विभाग अहेरी यांच्या टीमला पाचारण केले. आणि प्राथमिक उपचार म्हणून बोरी येथील प्रायव्हेट व्हेटर्नरी डॉक्टर किशोर आत्राम यांना बोलावुन उपचार करण्यास सांगितले. गावकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन जंगलातून संपूर्ण बकऱ्या गावात आणल्या उशिरा का होईना परंतु पशुवैद्यकीय चम्मू उपचारासाठी बोरी राजपूर ग्रामपंचायत च्या परिसरात दाखल झाले. आणि कशाचीही वेळ न लावता त्यांनी उपचार करण्यास सुरुवात केले डॉक्टरांच्या उपचारामुळे 97 बकऱ्या बचावल्या. डॉक्टर अंकित मत्ते यांनी बकऱ्याचे शव विच्छेदन करून विषारी चाऱ्याने पोटात गॅस होऊन मृत्यू पावल्याचे सांगितले.
मात्र बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात गेल्या चार वर्षापासून डॉक्टर उपलब्ध नाही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा भ्रमणध्वनी वरून वरिष्ठांशी संपर्क केला.असता ठीक आहे.डाॅक्टर उपलब्ध करून दिला जाईल,शासन व प्रशासन आणिलोकप्रतिनीधी याकडे काना डोळा करतात .मात्र अजूनही प्रायव्हेट डॉक्टर किशोर आत्राम यांच्या भरोशावर बोरी येथील पशु जगत आहेत हे विशेष सरकारी दवाखाना असून त्याचा वेळीच उपचार होत नसेल तर काय उपयोग सध्या स्थितीत जनावरावर मोठे आजार येण्याचे संकेत दिले जात आहेत. तेव्हा या भागातील पशुची जबाबदारी किशोर आत्राम या प्रायव्हेट डॉक्टर वरच राहील का. असा सवाल जनतेतून करत आहेत.
अहेरी येथील चमूने 97 बकऱ्याचे जीव वाचवल्याबद्दल बोरी परिसरातील जनतेने पशुवैद्यकिय चमुचे अभिनंदन केले. मात्र विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्या दगावल्यामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अहेरी येथून आलेल्या पंचायत विस्तार अधिकारी खमनचेरु येथील डॉक्टर अंकित मत्ते.देवलमारीचे पशुधन पर्यवेक्षक राजेश उसेंडी. पशुधन परिचर खमनचेरू किशोर टेकाम.पशुधन परिचर बोरी टी.पी. ठाकूर.आणि प्रायव्हेट डॉक्टर किशोर आत्राम यांनी वेळीच मदत देऊन उर्वरित बकऱ्यांना जीवदान दिले.या पशुवैद्यकीय टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.



