सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे 64 व्या शाखेचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे 64 व्या शाखेचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन चामोर्शी.-ग्रामीण व अति दुर्गम क्षेत्रातील लोकांना बचतीचे महत्त्व पटवून त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून उन्नती साधण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या सहयोग समूहाच्या वतीने सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीची स्थापना करण्यात आली. सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला 17 वर्षे पूर्ण झाले असून, दी.8 सप्टेंबर 2022 रोजी चामोर्शी येथील 64 व्या शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहयोग समूहाचे संस्थापक श्री. रमणजी रमादे सर, सहयोग समूहाचे अध्यक्ष श्री जयेशजी रमादे सर, सहयोग समूहाचे मुख्याधिकारी श्री विलासजी वासनिक सर,तसेच सहयोग समूहाचे रीजनल मॅनेजर श्री मंगेश जी कठाने सर, बोमनवार हायस्कूलचे प्राचार्य श्री . तुमपल्लीवार सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक बंडोपंत गुरनुले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गोंदिया ,गडचिरोली ,चंद्रपूर, लाखांदूर ,आरमोरी ,वडसा, कुरखेडा येथील कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.कार्यक्रमाचे संचालन टीम लीडर श्री.जी. खोब्रागडे सर, प्रास्ताविक शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री महेश सुखदेव सर, तर आभार प्रदर्शन सहयोग समूहाचे जिल्हाप्रमुख श्री.योगेश खोब्रागडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चामोर्शी येथिल कर्मचारी सहकार्य केले.