चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
Press Note
भाजपा तेली समाज कार्यकारिणीची पत्रकार परिषदेमध्ये माहिती
आशिष पिपरे हा केवळ जातीय घटक असून तो म्हणजे काही संपूर्ण तेली समाज नाही त्यामुळे आमदार होळी यांनी तेली समाजाचा कुठलाही अपमान केला नाही अशी माहिती आज दि.10 सप्टेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा तेली समाज कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
वर्गणी मागण्यास आलेल्या आशिष पिंपरे यांनी वैयक्तिक द्वेषापोटी आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्यावर खोटे व निराधार आरोप केले आहे. त्याला सर्वांसमोर बाहेर जाण्यास सांगितले त्यामुळे माझा हा अपमान आहे असे म्हणून त्याने आमदार होळी यांनी संपूर्ण तेली समाजाचा अपमान केला असे खोटे व निराधार आरोप केलेले आहेत. कारण नसताना आमदार होळी यांच्या विरोधात त्यांच्या घोषणा,पोस्टर जाळपोळ, बदनामीकारक फोटो,व्हिडिओ, लेख,व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून वैयक्तिक द्वेषापोटी व राजकीय हव्यासापोटी संपूर्ण तेली समाजाला वेठीस धरून बदनामी करण्याचे अशोभनीय कार्य केले आहे. त्यामुळे भाजपा पदाधिकारी तेली समाजाच्या वतीने आशिष पिपरे यांचा जाहीर निषेध करण्यात येत असून आमदार होळी यांनी कधीही तेली समाजाच्या संदर्भात अपमान करणारे एकही वक्तव्य केले नाही त्यांनी नेहमीच आपल्या तेली समाजाचा सन्मान केलेला आहे व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तेली समाजाला नगरपरिषद, जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व देऊन समाज बांधवांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने व ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवण्याचा काम त्यांनी केला आहे.
आशिष पिपरे हा तेली समाजाचा केवळ एक जातीय घटक आहे तो म्हणजे संपूर्ण तेली समाज होत नाही त्यामुळे त्यांनी आपला द्वेष आपल्या पुरते मर्यादित ठेवावा त्याचा तेली समाजाशी संबंध जोडू नये. तेली समाज हा नेहमीच आमदार होळी यांच्या पाठीशी राहिला असून मागील दोन निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी या समाजाने निवडून दिलेले आहे त्यामुळे आशिष पिपरे यांनी आपली मर्यादा ओळखून आरोप करावे व आपला राजकीय व वैयक्तिक द्वेष हा स्वतःपुरती मर्यादित ठेवावा त्याच्याशी संपूर्ण तेली समाजाला जोडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आशिष पिपरे यांना जिल्हा महामंत्री ओबीसी या पदावरून काढण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष कडे पाठपुरावा करू व त्यांना पदावरून न काढल्यास चामोर्शी भाजपा तालुका कार्यकारणी हे आपल्या पदांचा राजीनामा देणार असे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा युवा मोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री ओबीसी भास्कर बुरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, उपसरपंच शेषराव कोहळे, काशिनाथ बुरांडे, भाजपा तालुका सचिव उमेश कुकडे, विनोद गौरकार, लक्ष्मण वासेकर लोमेश सातपुते, संजय चलाख, शिवराम बारसागडे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, मनीष भांडेकर, विजय सातपुते, दीपक वासेकर, महेश वैरागडे,गितेश बारसागडे, पुरुषोत्तम बोरकुटे, दीपक वासेकर आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.