गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि
धानोरा गडचिरोली मार्गावर अनेक लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत यात प्रामुख्याने काकडे जवळील दोन्ही बाजूंनी मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पाच ते सहा दिवसापूर्वी तीन जण एकाच वेळी त्या खड्ड्यामध्ये पडून अपघात होऊन किरकोळ जखमी झाली होती तसेच लेखा या गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एक छोटा ट्रक एम एच 33 4902 हा ट्रक फसला होता गावकऱ्यांच्या मदतीने तो ट्रक बाहेर काढण्यात आला धानोरा गडचिरोली मार्ग अनेक लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे परंतु या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रा अवस्थेत असल्याचे दिसून येते पाच-सहा दिवसापूर्वी राधेश्याम बाबा जवळील या खड्ड्यामध्ये एक दुचाकी चालकाचा अपघात होऊन दोन जण जखमी झालेली होते. अजून किती अपघात व किती लोकांचे प्राण घेतल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रा अवस्थेतून बाहेर येऊन बाहेर येतील माहित नाही कमीत कमी तात्पुरता तरी रस्ता बनवावे अशी नागरिकांची मागणी आहे