धानोरा तालुक्यामधील सर्वच शासकीय कार्यालय ओस

धानोरा ता. प्रतिनिधी

रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने रांझीनाला धानोरा गडचिरोली रोडवरचा आणि सोडे च्या कठाणी नदीला पूर आल्यामुळे रस्ते बंद आहेत त्यामुळे कोणते सरकारी कार्यालयातील अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित नव्हते साडेबारा वाजेपर्यंत प्रतिनिधींनी भेट दिली असता फक्त चतुर्थ कर्मचारी एक ते दोन प्रत्येक कार्यालयात दिसून आले या कार्यालयामध्ये महसूल मंडळ कार्यालय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बाल विकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालय सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीओ ऑफिस तहसील कार्यालय उपकुशागार कार्यालय धानोरा व इतर कार्यालय या कार्यालयामध्ये एक चतुर्थ कर्मचारी व्यतिरिक्त कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते

सर्वांना शासनाच्या नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे मुख्यालय राहून सेवा बजावयाची असते परंतु एकही कर्मचारी धानोरा येथे मुख्यालय राहत नाही आणि वरील सर्व ठिकाणी भेट दिली असता महसूल आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धानोरा या कामासाठी काही लोक आले होते व त्यांची वाट पाहत होती व त्यांच्या गेटला लॉक लावलेला होता पुन्हा अजून हा प्रश्न ऐरणीवर येतो की मुख्यालय कोण राहणार अधिकारीच राहत नाही तर कर्मचारी का म्हणून राहतील हा एक मोठा प्रश्न आहे

त्याच पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन च्या कार्यालयाशी संबंधित असणारे जे काही अधिकारी व कर्मचारी महसूल मंडळ तहसील कार्यालय यातले कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते ग्रामसेवक सर्व अपडाऊन करतात त्याच पद्धतीने गडचिरोली ते धानोरा नव्हे तर सावरगाव पर्यंत दररोज अपडाऊन करणारे कर्मचारी दिसून येते जे ७० किलोमीटर पर्यंत रोज कर्मचारी अपडाऊन करतात आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामात दिसून येतो आज या आलेल्या रांजी नदीला पुरामुळे ही परिस्थिती दिसून आलेली आहे