भामरागडच्या पर्लकोटेला चौथ्यांदा महापूर, वाहतुक ठप्प

भामरागड ता. प्रतिनिधी

नजीकच्या पर्लकोटा नदीला महापूर आला असून नदीपूलावर ३ ते ४फुट पूराचे पाणी आहे.त्यामुळे आलापल्ली -भामरागड आवागमन बंद असून भामरागडचा संपर्क तुटला आहे.

छत्तीसगड राज्यात व भामरागड परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे इंद्रावती,पामुलगौतम व पर्लकोटा नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.या तिन्ही नद्यांना महापूर आल्यास इंद्रावती नदी पर्लकोटा व पामुलगौतमचा प्रवाह पुढे जाऊच देत नाही.परिणामी पूराचे पाणी भामरागडचे मुख्य बाजारपेठेत शिरते व बाजारपेठेतील दुकानांचे,घरांचे व सामान्यांचे नुकसान होते.त्यामुळे दुकानदार हवालदिल होतात.दरवर्षी महापूर येतो.यावर्षी चौथ्यांदा आलेला हा महापूर आहे.सध्या नदी पुलावरून ३ ते ४ फुट पाणी वाहत आहे.सध्यातरी बाजारपेठेत पाणी शिरले नाही;मात्र इंद्रावती ने पर्लकोटेचा प्रवाह रोखल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महसूल विभाग, नगरपंचायत व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत.