विद्यार्थ्याना वेळे नुसार बस सेवा उपलब्ध करा

म.रा. शिक्षकपरिषद अध्यक्ष संतोष सुरावार यांची निवेदनाद्वारे मागणी

चामोर्शी:- तालुक्यातील लहान मोठ्या गावातील विद्यार्थीनी उच्य शिक्षणासाठी चामोर्शी येथे ये जा करीत असतात . मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्याच्या वेळेनुसार बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र यावर्षी वेळेवर बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान होत आहे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत म. रा. शिक्षक परिषद जिल्हाअध्यक्ष संतोष सूरावार यांनी गडचिरोली आगार प्रमुख यांना निवेदन देऊन विद्यार्थ्याचे वेळेनुसार बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे

मुळचेरा , घोट , पेटतळा वरून चामोर्शी करिता सकाळी ७ वाजता बस येते ती बस मुलचेरा, घोट, सिमुलतराव व पेटतला वरून चामोर्शी आल्यास तेथील विद्यार्थ्याना सोयीचे होईल त्या विद्यार्थ्याचे कॉलेज १२ .३० वाजता बंद होत असल्याने त्या वेळात त्या मार्गावर बस नसल्याने त्या विद्यार्थ्याना सायंकाळी ५ वाजेपर्यंत बसची वाट पहात रहावे लागते त्यासाठी चामोर्शी ते नेताजी नगर, घोट , सिमुलतला पेटतळा करिता दुपारी १.३० वाजता बस उपलब्ध करून दिल्यास या मार्गाने ये जा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्याचे सोयीचे होईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्याची दखल घेत ०९ सप्टेंबर रोजी आगार प्रमुख म. रा. परिवहन विभाग गडचिरोली यांना निवेदन दिले असून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनाही निवेदनाची प्रत देऊन या प्रकरणी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे