आदिवासी एकता युवा मंच गडचिरोली तर्फे जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा

प्रेसनोट 

आदिवासी एकता युवा मंच च्या वतीने गडचिरोली येथील आदिवासी समाज भवनात जागतिक आदिवासी अधिकार दिवस मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची अध्यक्षता माजी प.स. सभापती मारोतराव ईचोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, समाजसेवक वसंतराव कुलसंगे, नरेन्द्र शेडमाके, कुणाल कोवे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन केली.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी जागतिक आदिवासी अधिकार दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. सोबतच कायद्याचे ज्ञान, संविधानाचे वाचन, व समाजातील वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कँडर बेस संघटन व समाज जागृती आवश्यक असल्यामुळे आदिवासीतील सर्व जातीनी आप- आपसातील हेवे-दावे बाजुला सारून एक होने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव प्रदिप कुलसंगे यांनी केले तर आभार गिरीष ऊईके यांनी मानले.

कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष संजय ऊईके, सचिव प्रदिप कुलसंगे, उपाध्यक्ष माणिक गेडाम, सहसचिव सुधिर मसराम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, संघटक संजय मसराम, सदस्य मुकूंदाजी मेश्राम, उमेशभाऊ ऊईके, प्रफुल्ल कोडापे, आकाश कोडापे, गिरीष ऊईके, सुरेश चिकराम, वासुदेव कोडापे, माणिक आत्राम, रूपेश सलामे, राकेश कुळमेथे, प्रशांत मडावी, हेमाताई कुलसंगे, सारिका ऊईके, माही ऊईके, पिहु ऊईके, तृष्णा सिडाम, रिध्दिमा कुलसंगे, देवयानी ऊईके, माही ऊईके, संजय चिकराम, साहिल आत्राम, माणिक मडावि, तुषार मसराम, देवाजी कोडापे, अनुष्का कुलसंगे, रेखाताई कोडापे, सीमा कोडापे, लक्ष कोडापे, तक्ष कोडापे, साई ऊईके, चंद्रकला ऊईके. आदि समाज बांधव उपस्थित होते.