ज्ञानदीप अभ्यासिकेच्या सुविधा पूर्ण हाल चे उद्घाटन

चामोर्शी तालुका प्रतिनिधी 

चामोर्शी:- येथील तालुका शाखा जिल्हा विकास संशोधन व कर्यांनवय सांस्थेच्या वतीने आष्टी कार्नर हनुमान मंदिराच्या सभागृहात चालविण्यात येत असलेल्या ज्ञानदीप अभ्यासिकेतील विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेऊन आधुनिक युक्त फर्निचर बैठक हालचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी संस्थेचे सल्लागार प्र.सो. गुंडावार यांचे हस्ते पार पडले.

यापूर्वी संस्थेची सभा संस्थेचे अध्यक्ष पी. जे. सातार यांचे अध्य्षतेखाली झाली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर. चलकलवार, विलास गण्यारपवार, सल्लागार प्रं. सो. गुंडावार, आर. डी. राऊत, सुधाकर घुंमडेलवार, बबन वडेट्टीवार, मदन नैताम, जे. जी. मारस्कोले, अरुणा रामटेके, कविता झाडे, गीता आत्राम, संगीता झाडे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक विषयावर संवाद साधत शहर विकासात्मक जनतेच्या समस्या बाबत चर्चा करून पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या ज्ञानदीप अभासिकेच्या विद्यार्थ्याच्या सर्व सोयी युक्त फर्निचर बैठक व्यवस्था नव्याने करून १४ सप्टेंबर रोजी हालचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगीअभ्यासिका व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रणव किनेकर यांनी अभासिकेत आतापर्यंत १७ विद्यार्थी नैकरीवर लागल्याचे सांगत संस्थेने अभासिकेला सहकार्य केल्या बद्दल सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे तेजस मेक्रतीवार, जगदीश दुधबले , किशोर लटारे, श्रीकांत कुंघडकर, , पौर्णिमा भोयर, लाडे आदीचे सहकार्य लाभले.