श्री, नंदकिशोर वैरागडे , प्रतिनिधी , न्यूज जागर
मोर्चातील घोषणाबाजीने कोरची दुमदुमली
कोरची
बहुल आदिवासी कोरची तालुक्यामध्ये बालविकास प्रकल्प कार्यालय कोरची अंतर्गत, अंगणवाडी व मिनी अंगणवाडी जवळपास दीडशे आहेत त्या अंगणवाडी मध्ये कार्यरत असलेले जवळपास कर्मचारी तीनशे असून त्या कर्मचार्यांनी आज दिनांक १६/०९/२०२२ रोजी शुक्रवार ला दुपारी १.०० वाजता , अंगणवाडीच्या मागण्यांचे निवारण करण्याकरता येथील मुख्य मार्गाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावरती अंगणवाडी व मदतनीस सेविकेचा स्पीकर च्या आवाजात कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर मोर्चेकर यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्राचारण करून निवेदन सादर करण्यात आले. त्या निवेदनामध्ये१) माहे 2022 पासून घर भाडे पैसे दिले नाही,२) रेणू रामदास बोगा पोचणारा क्रमांक दोन यांची पदोन्नती का झाली नाही ती ताबडतोब कारवाई करण्यात यावी,३) बोरी क्रमांक दोन अर्चना योगेश साहारे यांना कामावर रुजू करणेबाबत,४) टी.ए.डी.ए.चे पैसे , अजूनही मिळाले नाही ते तात्काळ देण्यात यावे,५) मानधनात वाढ करण्यात यावी६) नवीन मोबाईल तातडीने द्यावा७) दरमहा पेन्शन द्यावी.८) पोषण ट्रेंकर, अ पूर्णपणे मराठीत द्यावे तोपर्यंत ते भरण्यात ची सक्ती होता कामा नये ९) प्रोत्साहन भत्ता सेविकेला ५०० ऐवजी २००० रुपये व मदतनीसला २५० ऐवजी १००० रूपये , द्यावा १०) सेविका, मदतनीस, सुपरवायझर, व प्रकल्प अधिकारी यांना तातडीने नियुक्ती द्यावा.११) अंगणवाडी इमारतींना केलेली भाडेकर विनाअट देण्यात यावी,१२) प्रवास भत्ते सीबी चे पैसे साड्यांचे पैसे निधी रिचार्ज चे पैसे वाढवून द्यावा व वेळेवर द्यावा१३) पोषण आहार अमृत आहार यांचे दर तिप्पट करा .१४) मिनी अंगणवाडी मदतनीस देऊन मोठ्या अंगणवाडी रूपांतर करा,? आधी मागण्यांचा निवेदन सादर करण्यात आले त्यानंतर चर्चा करण्यात आली त्यावेळी श्रीमती किसनबाई भानारकर राज्य कार्याध्यक्षा ,मायातदिले,ढाकणे अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूर ,उज्वला नारनवरे सचिव नागपूर,मंजुळाबाई वाढई अध्यक्ष कोरची,मंदाबाई नंदेश्वर उपाध्यक्ष, हिराबाई पडोटी सचिव,वनिता कुमरे सदस्य,ज्योती कोरेटी,अरूणा नंदेश्वर,कलाबाई सहारे,हेमलता सयाम,मंदा शेंडे,चंद्रकुमारी मानिकपूरी,पंचफुला उईके,इत्यादी अंगवाडी व मदतनीस तीनशे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती मोर्चेकर्यांनी प्रभारी प्रकल्प अधिकारी चिमूरकर मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्यावरील समस्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले
त्यावेळी कोणतीच अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.