राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरची तालुक्यात 18 सप्टेंबरला परिवार संवाद यात्रे आयोजन

श्री.श्याम यादव कोरची प्रतीनिधी, न्यूज जागर 

तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहण्याचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी यांचे आवाहन

कोरची
तालुक्यातील शेतकरी शेतमजूर दुर्बल घटकातील व्यापारी यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवार संवाद यात्रे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेत तालुक्यातील ज्वलंत समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक अध्यक्ष सियाराम हलामी यांनी केले आहे.

तालुक्यातील कोडगुल येथे सकाळी 10 वाजता गाहणेगटा 12 कोटरा 2 वाजता बेडगाव येथे सायंकाळी 4 वाजता परिवार संवाद यात्रे आगमन होणार असल्याने परिसरातील नागरिकांना आप आपल्या गावातील भागातील समस्याचे निवेदन घेऊन वरिष्ठांना देवून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे
या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार धर्मामारावबाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,लीलाधर भरडकर जिल्ह्या युवक अध्यक्ष,शाहीन हकीम महिला जिल्ह्य अध्यक्ष , उपस्थित राहणार आहेत.