चामोर्शीत सेवा पंधरवाडा निमित्त प्रभात फेरी

  • चामोर्शी – इंडियन लिग व स्वच्छ अमृत महोत्सवा अंतर्गत नगरपंचायत प्रशासना तर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून कचरा मुक्त शहर करण्याकरिता दिनांक १७ सप्टेंबर रोजी कचरा मुक्त शहर स्वच्छता प्रभात फेरी काढण्यात येऊन नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली .
    सदर रॅली केवळरामजी हरडे महाविद्यालय ,शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय , नेहरू युवा केंद्र ,नगरपंचायत कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी व नगरपंचायतीचे पदाधिकारी यांनी स्वच्छता रॅलीची सुरुवात नगरपंचायत – बाजार चौक, मुख्य बाजारपेठ , बस स्टॉप , कृषी बाजार ते परत नगरपंचायत येथे स्वच्छता रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छते विषयीचे महत्व पटवून देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली .
    यावेळी कचरा मुक्त शहर स्वच्छता रॅलीत नगराध्यक्ष जयश्री वाय लालवार ,उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे ,सभापती प्रेमा आईंचं वार ,नगरसेविका गीता सोरते , स्नेहा सातपुते स्वच्छता कार्यक्रम प्रमुख अल्केश बनसोड , प्राध्यापक पवन नाईक महादेव सदावर्ते गणेश दांडेकर महेश जोशी प्रशांत माथोरे प्राचार्य डॉ . धोटे डॉ . हेमराज निखाडे प्राध्यापक सोमेश्वर झाडे प्रा . काशेट्टीवार प्रा . सौसाखडे प्रा.आंबोरकर नगरपंचायत कर्मचारी जगदीश नक्षीने मोरेश्वर पेंदाम भरत वासेकर हाफिज सय्यद रमेश धोडरे दिलीप लाडे श्रीकांत नैताम विजय पेदिवार संतोष भांडेकर प्रभाकर कोसरे रितिक खंडारे स्नेहल भुरसे सोनी पिपरे नेहरू युवा केंद्राचे कल्याणी गायकवाड व स्वच्छता पर्यवेक्षक रुषी गोरडवार स्वच्छता कर्मचारी व केवळरामजी हरडे महाविद्यालय व शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी . कचरा मुक्त शहर स्वच्छता प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते .
    विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हातून नगरपंचायत चामोर्शी अहेरी या दोन नगरपंचायती इंडियन स्वच्छता लिग करिता पात्र झाल्याची माहिती स्वच्छता कार्यक्रम प्रमुख अल्केश बनसोड यांनी दिली . .