चामोर्शी शाखेत स्व. खुशालराव वाघरे यांचा स्मृतिदिनसारा
चामोर्शी–दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली चे संस्थापक सचिव स्व. खुशालराव वाघरे यांचा तिसरा स्मृती दिन चामोर्शी शाखेत त्यांच्या प्रतिमेला हारार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज येथील शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्थापक स्व. खुशालराव वाघरे यांच्या तिसऱ्या स्मुर्ती दिन कार्यक्रमात त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ,काही वर्षापर्वी सामान्यमाणसाची गरज लक्षात घेऊन नागरी पतसंस्थेची जिल्ह्यात स्थपणा करून सामान्य माणसाची गरज पूर्ण केली जिल्ह्यात संस्था बळकट करत त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य करून त्यांनी संस्थेला नावारूपाला आणले. असे गौरवादगार मान्यवरांनी काढले.
याप्रसंगी व्यवस्थापक सदाशिव वाघरे, माजी प्राचार्य जयंत भिलकर, पत्रकार समितीचे उपाध्यक्ष बबन वडेट्टीवार, प्रा. रत्नाकर बोमिडवार, कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल, छबिल कीनेकर, संजय चापले,अशोक आकुलवार, अमोल आकतोटावार,देवा कीनेकर व इतर बँकेचे आवर्ती ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.