मोनंदा संस्थेच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती

.श्री. नंदकिशोर वैरागडे प्रतिनिधी , न्यूज जागर 

कोरची
कोणत्याही दुर्धर रोगांपासून सामान्य जनता सतर्क होऊन योग्य वेळी, योग्य उपचार करण्यासाठी सेवानिवृत्त डॉ. नंदेश्वर हे नेहमीच जनजागृती चे कामे करीत आहेत.

अशाचप्रकारे कुष्ठरोग व क्षयरोग बाबतीत तालुक्यातील बेलगाव( घाट), दवंडी, कोहका, बेळगाव, जामनारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोनंदा बहुउद्देशीय संस्था बोळधा ( गावगन्ना) च्या वतीने जनजागृती करण्यात आली. सेवानिवृत्त डॉ. हरिदास नंदेश्वर यांनी कुष्ठरोग व क्षयरोगाचे कारणे, लक्षणे, उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भित्तिचित्रे/ भित्तिपत्रके वाटण्यात आली.