चामोर्शी येथे ईद ए मिलाद निमित्य कार्यक्रम

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी :- चामोर्शी येथील जामा मस्जिद कमेटी तर्फे ईद ए मिलाद उन नबी हा मुस्लिम बांधवांचा सन मोठ्या उसह्त व सादगीने साजरा करण्यात आला.
इस्लाम धर्मातील एक महत्वाचा सन म्हणून ओळखला जातो. या दिवशी हजरत मो. पैगंबर यांचे जन्म दिवस म्हणूनही साजरा केला जातो

या निमित्याने चामोर्शी येथील जामा मस्जिद कमेटी तर्फे परचम कुशवाही (ध्वजारोहण )मस्जीद चे सदर हाशिम खान यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले होते जामा मस्जिद चे मौलाना हाफिज मन्सूर आलम यांनी अमन ,शांती व खुशहाली साठी दुआ मागितली मुस्लिम समाजाच्या बांधवांनी खजूर व चॉकलेटचे वाटप केलेत चामोर्शी येथील हजरत अब्दुल शहा बाबा यांचे दर्ग्यावर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जुलूम खान ,नियाजु खान ,इम्रान शेख ,लतीफ खान ,रियाज शेख ,नाजिम शेख ,बादशाहभाई, मौलाना मुक्बिल रजा ,फैयाज शेख, असलम खान ,आरिफ शेख, फिरोज खान, हसन सैयद, सैयदभाई ,अहेसान खान, इत्यादी मुस्लिम बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.