श्री विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देशात बेरोजगारीचे प्रमाण बेसुमार आहे.त्यातही गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही.त्यामुळे योग्य मार्गदर्शना अभावी बेरोजगार नको त्या कामात भरकडत आहे. या भरकडत जात असणाऱ्या युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे किंवा व्यवसायाकडे वळावे. पाहिजे त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे व मार्गदर्शन व पुस्तकपेढी उभारण्याकामी आम्ही पुढाकार घेवू असे प्रतिपादन वडसा वनविभाचे उप-वनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल(आय.एफ.एस.) यांनी उपस्थित युवकांना उद्देशुन केले. देसाईगंज येथील आर्यसत्य बुद्ध विहार आयोजित प्रेम धांदे यांचा प्रबोधनपर संगीतमय बहुआयामी कार्यक्रमाच्या उद्घाटणीय समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते.
दिनांक १६ आँक्टोबर २०२२ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात अंदाजे ५ ते ६ हजार लोकांची गर्दी जमली होती हे विशेष. उद्घाटणीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता (विद्युत कंपनी) विजय मेश्राम होते. सहउद्घाटक म्हणून प्राचार्य अनिल थुल तर प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहाय्यक वनाधिकारी रमेश घुटके,सामाजिक विचारवंत चंद्रशेखर बांबोळे,पत्रकार पुरुषोत्तम भागडकर,बुदीष्ट सोसायटीचे विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, बौद्ध समाज कोअर कमिटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,सा.कार्यकर्ते लक्ष्मण नागदेवते,प्रा.डाँ.मिथून राऊत,पिंकू बावणे,समतादुत वंदना धोंगडे,बौध्द भिख्खू धम्मप्रिय,बौद्ध भिख्खू संघप्रिय धम्मज्योती आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथील विद्यार्थी सुशिल हेडाऊ देशपातळीवर गुनानुक्रमे प्रथम आल्याने त्याचा शाल व पुष्पगुच्छ देवून उप-वनसंरक्षक सालविठ्ठल यांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
नागवंशीय शुरविर महार मर्दांचा पोवाडा गायक मुंबई येथील प्रबोधनकार प्रेम धांदे यांनी संगीतमय कार्यक्रमातून रात्री ११.०० ते पहाटे ४.०० वाजेपर्यत भिम गित,रमाई गित,अंधश्रद्धा निर्मुलनपर गिते,राजे छत्रपती,राजे संभाजी यांच्या शौर्याचे गिते गावून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन गेडाम यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते अरविंद घुटके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संतोष बहादुरे,सुबोध मेश्राम,विलास मेश्राम,आशिष घुटके,नुबीर फुले,जगदिश तामगाडगे,डाकराम वाघमारे,सुरज लिंगायत,राजेश बहादुरे,सावन शेंडे,कपिल बोरकर,शैलेंद्र रामटेके,शंकर बेदरे,अजय बनकर,विवेक लोखंडे,मनोज सोनेकर,दिपक पिलेवान आणि आर्यसत्य बुद्ध विहार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाकरीता शहरातील नागरीकांसहीत ग्रामीण भागातील व लागून असलेल्या गोंदीया,भंडारा,चंद्रपुर जिल्ह्यातील रसिकांनी गर्दी केली होती.