गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
होप फॉउंडेशन सिरोंचा ही संस्था गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्यातच एक भाग म्हणून आज दिनांक 10/11/2022 ला होप फॉउंडेशन सिरोंचा तर्फे तीन क्षय रुग्णांना प्रोटीन किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, डॉ कांबळी,होप फॉउंडेशन सिरोंचा चे संचालक नागेश मादेशी, तालुका क्षय रोग पर्यवेक्षक स्नेहा गायकवाड, क्षय रोग समन्वयक गणेश खडसे, लिपिक करण बनुबाकडे,प्रदीप मुनघाटे, कृष्णा निकुरे, शरद निकुरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने क्षय रोग हा आजार होतो त्यामुळे क्षय रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने होप फॉउंडेशन सिरोंचा ने केलेला कार्य हे खूपच प्रशांसनिय आणि कौतुकास्पद आहे असे जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ सचिन हेमके यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यालय गडचिरोली येथील जिल्हा क्षयरोग कार्यक्रम समन्वयक मनीष बोदेले, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील दंत तंत्र तंत्रज्ञ करुणा बनसोड, आणि ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील कर्मचारी, होप फॉउंडेशन सिरोंचा चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.