बॅंक आपल्या दारी  यशोधरा विद्यालयाचा अभिनव उपक्रम

चामोर्शी  तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी  

विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना असतात. परंतु या योजनेसाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात . त्यामध्येही बँकेचे पासबुक महत्त्वाचे असते. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे बँकेचे पासबुक नाही . त्यामुळे ते विद्यार्थी लाभाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन प्राचार्य शाम रामटेके यांनी पुढाकार घेऊन बँकेशी संपर्क करून बँकेच्याच प्रतिनिधींना शाळेत पाचारण करून ज्या विद्यार्थ्यांचे बँकेत अकाउंट नाही, अशा विद्यार्थ्यांचे अकाउंट उघडण्याचे काम करण्यात आले. यावेळी २५ विद्यार्थ्यांचे बॅंक खाते उघडण्यात आले . शाळेने केलेल्या या अभिनव उपक्रमाचे अनेक पालकांनी कौतुक केले. सदर प्रक्रिया प्राचार्य शाम रामटेके यांच्या मार्गदर्शनात प्रविण नैताम यांच्या पुढाकाराने पुर्ण करण्यात आली . या कामी भारतीय स्टेट बँक सेवा केंद्राचे संचालक उत्कर्ष तुरे, प्रकाश बारसागडे , राजू धोडरे, साजेदा कुरेशी, सरिता वैद्य, जयश्री कोठारे , सुधाकर भोयर, रूपलता शेंडे, लक्ष्मण गव्हारे यांनी सहकार्य केले .