चामोर्शी प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२४/११/२०२२
चामोर्शी
सोशल एज्युकेशन मुव्हमेंट युनिट चामोर्शीच्या वतीने दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी लुंबिनी बौद्ध विहार चामोर्शी येथे संविधान प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.के. प्रेमकुमार , अध्यक्षस्थानी सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे राज्य कार्यकारिणी सदस्य नरेन गेडाम तर उद्धाटक म्हणुन देवेंद्र रायपुरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत .
याप्रसंगी संविधान जागर स्पधेचे बक्षिस वितरण सुध्दा करण्यात येणार आहे . या कार्यक्रमाला डॉ. यशवंत दुर्गे , पी.जे. सातार , प्रा.डॉ. हिराचंद वेस्कडे , प्रा. इंदिरा नागदेवते , भीमराव गोवर्धन , शिवराम मोंगरकर , भास्कर मुन , देवेंद्र सोनपिपरे, धर्मानंद मेश्राम , शाम रामटेके प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत . तरी चामोर्शी व परिसरातील जनतेने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेमचे तालुका संयोजक दादाजी शेडमाके व सहकाऱ्यांनी केले आहे .