गोंडवाना विद्यापीठात ‘सविधान स्त्री हक्क आणि वर्तमान’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन

न्यूज जागर गडचिरोली

दि.२९/११/२०२२

गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठात 30 नोव्हेंबर रोजी ‘संविधान स्त्री हक्क आणि वर्तमान’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तसेच विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका तथा सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाने करतील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे चर्चासत्र दिवसभर चालणार असून सकाळी ११ ते १२. ०५ पर्यंत उद्घाटन कार्यक्रम त्यानंतर पहिले सत्र १२. १५ ते १. ३० दीड वाजेपर्यंत असून यामध्ये सुप्रसिद्ध लेखिका, स्तंभ लेखिका तथा सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुळकर यांचे ‘संविधान आणि स्त्री विषयक कायदे’ व संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार, प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यान देतील. दुसरे सत्र दुपारी २. ३० ते ३. ३० या वेळेत असून या सत्रात कायदे अभ्यासक ऍड. स्मिता ताकसांडे ‘संविधानातील बाल हक्क आणि वास्तव’, विवेक सरपटवार ‘भारतीय संविधानाचे वेगळेपण ‘ या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर ३. ३० ते ४ या कालावधीत खुली चर्चा ठेवलेली असून ०४ ते ०५ या वेळात समारोप कार्यक्रम घेण्यात येईल. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या प्राचार्य सन्मित्र सैनिकी विद्यालय, बल्लारपूर अरुंधती कावडकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय राहील ‘संविधानाची शक्ती महिलांची प्रगती आणि राष्ट्र उभारणी’ या वेळेला प्रमुख प्रमाणे म्हणून माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले.