गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
दि.२९/११/२०२२
गडचिरोली
रात्रीच्या अंधारात होते तस्कर
वनविभागाचे दुर्लक्ष
गडचिरोली- महाराष्ट्र – तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात असलेल्या आणि मौल्यवान सागवानांनी नटलेल्या सिरोंचा वनविभागात पुन्हा एकदा सागवान झाडांची वन तस्करांन कडून अवैद्य सागवान कटाई करून तस्करी करणारे तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे तस्कर रात्रीच्या अंधारात हा सागवान तस्करीचा खेळ सुरु असतो. रात्री गाढ झोपेत राहणाऱ्या सिरोंचा वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तस्करीचा मागमुसही लागत नसल्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सिरोंचा वनविभागात या आधीही तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील तस्करांनी कधी प्राणहिता नदीचा आधार घेऊन तर कधी कल्व्हर्टमधून सागवानाच्या लठ्यांची वाहतूक केली आहे. सिरोंचा तालुक्यातील जंगलातून तर गेल्या पाच दशकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान सागवान कापून त्याची वाहतूक करण्यात आली. एवढेच नाही तर वन्यप्राण्यांचीही तस्करी होत असल्याची कुजबुज सुरू आहे. गेल्या आठवड्यात तेलंगणा राज्यातील वन कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करीत महाराष्ट्र
राज्यातून आलेले सागवानाचे लठ्ठे पकडले. चौकशीत सदर सागवान लठ्ठे महाराष्ट्रातील जंगलातून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उलट चुकांवर पांघरून घालून बाहेर माहिती जाणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.