गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२/१२/२०२२
गडचिरोली
अनेक महीण्यापासुन गडचिरोली जिल्ह्यात विद्युत देयके बिना रिडींग आणि फोटो नसलेले देण्यात येत असुन यावर सरासरी देयके देण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अधिकचा बोजा बसत आहे, तसेच जिल्हयात अर्ज असलेले रिप्लेस मिटर तातडीने बदलविण्यात यावे, नव्याने कनेक्शन घेण्यात येणारे नविन मिटर तातडीने देण्यात यावे. इंदिरा नगर गडचिरोली मधील नगर परिषद शाळेजवळील मधोमध असलेले 33 के. व्ही ची लाईन तातडीने स्थानातर करण्यात यावे.सुशिक्षित बेरोजगारासाठी व्यवसायीक मिटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे.आणि मिटरवर रिंडीग दिसत नसल्यास अधिकचे विद्युत देयके देण्यात येवु नये. अशी मागणीही रुपेश वलके राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष गडचिरोली यांनी पत्रकान्वये केली आहे.
सदर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारासुद्धा रुपेश वलके राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष गडचिरोली, हेमराज लांजेवार, विनोद सहारे, मुजाहीद पठान, दिपक नंदेश्वर, अक्षय मेश्राम, व कार्यकर्त्यांनी दिला आहे.