मा. कपिल पाटील, आमदार यांचे प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबरला शिक्षक भारतीचा शिक्षक मेळावा

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि. २/१२/२०२२

चंद्रपूर

दि. ४ डिसेंबर २०२२ रोज रविवारला ठिक १२.०० वाजता सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न होत आहे. या अधिवेशनाला मा. आम. कपिलजी पाटील सर, संस्थापक अध्यक्ष, शिक्षक भारती, यांचे प्रमुख उपस्थितीत, मान. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपूर, यांचे हस्ते उघ्दाटन होणार असुन या अधिवेशनाचे अध्यक्ष मा. डॉ. विजय देवतळे, अध्यक्ष, ग्रा. शिक्षण प्रसारक मंडळ, वरोरा, हे राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन मा. ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा, मा. प्रशांतजी पोटदुखे, मा. संदिपजी गड्डमवार, अध्यक्ष, भारत शिक्षण संस्था, सावली, मा. जिनेशभाई पटेल, कार्याध्यक्ष, आदर्श शिक्षण मंडळ, चंद्रपूर, मा. केशवराव जेनेकर, सचिव, भा. ग्रामिण शिक्षण मंडळ, चंद्रपूर, शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार मा. डॉ. राजेंद्रजी झाडे, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र, मा. संजय खेडीकर, राज्य संयुक्त कार्यवाहक, शिक्षक भारती, महाराष्ट्र, मा. किशोरभाऊ वरभे, राज्य संघटन सचिव, शिक्षक भारती, महाराष्ट्र, मा. भाऊराव पत्रे, वि. अध्यक्ष, मा. सपन नेहरोत्रा, वि. कार्यवाहक, महाराष्ट्र हे उपस्थित राहुन शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात शिक्षकांच्या विविध समस्यांवर व मागण्यांवर चर्चा करण्यात येऊन शिक्षक भारतीने आजपर्यंत शिक्षकांच्या भल्यासाठी केलेल्या कार्याचा उहापोह करण्यात येणार आहे. तेंव्हा या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन प्रत्यक्ष आमदार महोदयांशी आपल्या समस्यांवर चर्चा करावी असे आवाहन जिल्हा अध्यक्ष श्री भास्कर बावनकर, जि. कार्या. श्री पुरूषोत्तम टोंगे, जि. कार्यवाहक श्री राकेश पायतडे, श्री किशोर दहेकर, शहर अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.