आदिवासी महामंडळाकडून शेतकऱ्यांची लुट.

श्री.श्याम यादव,प्रतिनिधी न्यूज जागर 

दि. २/१२/२०२२

कोरची 

या तालुक्यात आदिवासी महामंडळाकडून शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केली जाते. धान्य ठेवण्यासाठी शेड तयार करायचे आहे असे सांगून शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल 50/- रूपये परस्पर कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

या निर्णयाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल 50/- रूपये घेवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मागील 2-3 वर्षात कोरडा दुष्काळ पडला त्यामुळे धान्य कमी झाले. यावर्षी ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे धान्य कमी होत आहेत. आधीच नांगर, ट्रॅक्टर चे दर वाढलेत.मजूरांची मजूरी पण वाढली. खत आणि बियानाचे सुध्दा भाव वाढले आहेत. त्या तुलनेत धान्याला भाव नाही. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. स्वताची शेती पडीत राहू नये म्हणून नाईलाजास्तव शेतात राबावे लागते.असे असतांना महामंडळाने ५० रुपये प्रतो क्विंटल घेणे अन्यायकारक आहे,  महामंडळाने हा निर्णय न बदलविल्यास आंदोलन करण्याचा ईशारा शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे.

दुसरे असे की, कटनीच्या नावाने शेतकऱ्यांकडून ज्या पोत्यात धान्य खरेदी केल्या जाते,त्या पोत्यात 40 किलो ऐवजी 41.5 किलो धान्य घेतला जातो.तरीही महामंडळ दरवर्षी तोट्यात जाते. हा संशोधनाचा भाग आहे.

निवेदन देताना रामकुमार नाईक, संतोष सर्पा, मुरारी कुंजाम, प्रकाश नैताम, राजेश कुंजाम ,महादेव बंसोड,टेमलाल देवांगण,प्रकाश मेश्राम,धजेश्वर सोनकुकरा, मारोती साहाळा,परदेशी दुधकवर आणि बरेच शेतकरी यावेळी उपस्थित होते.