लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मुरुमगाव परिसरातील समस्या कायम, पत्रकार परिषदेतून आंदोलनकारी समितीचे आरोप. 15 डिसेंबर पर्यंत अल्टिमेटम

धानोरा तालुका प्रतिनिधी

धानोरा , दि.५/१२/२०२२

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव हि मोठी ग्रामपंचायत असून येथिल समस्येंकडे लोकप्रतिनिधी व प्रशाशनानी दुर्लक्ष केल्याचे दिसते, परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन परिसरातील समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना परिसरातील जनतेनी प्रथम निवेदन देवुन चक्काजाम आंदोलनं दिनांक १९आक्टोबरला केले. आंदोलनकारी समितीने ८ तास चक्काजाम आंदोलन केले.त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन मुरुमगाव येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु या घटनेला महिना उलटूनही ना बैठक बोलावली ना समस्या सोडविल्या.

यांच्या नाकर्तेपणामुळेच समस्या ” जैसे थे च “ आहेत असा आरोप  होत आहे  ,या भागाकडे कायम शासनाचे आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने १५डिसेंबर२०२२ पर्यंत मुरुमगाव परिसरातील समस्या मार्गी न लागल्यास 16 डिसेंबरला पुनश्च आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आंदोलनकारी समितीने दिनांक ४ डिसेंबर २०२२ ला मुरूमगाव येथील ग्रामपंचायत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेतून माहिती दिली

धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुरूमगाव येथील आंदोलन समितीने दिनांक ५सप्टेबंर२०२२ ला मुरूम गाव परिसरातील (१)मुरूम गाव येथे को-ऑपरेटिव बँकेची शाखा सुरू करावी (२)आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचे दर्जा द्यावा (३)मुरूम गाव येथील शासकीय आश्रम शाळेत ११,१२चे विज्ञान वर्ग सुरू करावे.(४) मुरूम गाव येथे 4जी सेवा सुरू करण्यात यावे(५) कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे (६)मुरूम गाव ते हिरंगे पर्यंत पक्का रस्ता तयार करणे अश्या एकूण 13 समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर दिनांक १९आक्टोबरला८ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.आंदोलनातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित राहुन खासदार अशोक नेते चे प्रतिनिधी प्रकाश गेडाम, रवींद्र भांडेकर, तसेच जिल्हाधिकारी साहेबांचे प्रतिनिधी माळी साहेब तहसीलदार कुरखेडा, डी. वाय .एस. पी . जाधव पोलीस स्टेशनं धानोरा यांच्या माध्यमातून तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत मध्यस्थी करीत आंदोलन कर्त्यांचे विशेष सभा दिनांक १.११.२०२२ला मुरूमगाव येथे तर३/११/२०२२ला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळासह बैठक बोलावून समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.पण ती बैठक मुरूमगाव येथे धानोरा चे तहसीलदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी धानोरा तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते तेव्हा पासुन एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज पर्यंत बैठक बोलावली नाही. एकंदरीत आमच्या समस्यांकडे बुद्धी पुरस्कृत दुर्लक्ष करण्यात येत आहे . परिसरातील संपूर्ण समस्या कायम असून एकही समस्या मार्गी न लागल्याचा आरोप आंदोलनकारी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली शासनाने वेळीच लक्ष देऊन येतील समस्या १५ डिसेंबर२०२२ पर्यंत पूर्ण न केल्यास दिनांक १६ डिसेंबर २०२२ पासून पुनश्च नाईलाजास्तव येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय आंदोलन समितीने घेतला आहे.

सदर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शिवनाथ टेकाम प्रतिष्ठित नागरिक ,शिवप्रसाद गवर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव ,अजमन रावटे माजी पंचायत समिती सभापती धानोरा, मुनीर शेख माजी ग्रामपंचायत सदस्य मुरूमगाव, हरीश धुर्वे सरपंच ग्रामपंचायत पन्नेमारा ,वसंत कोलीयारा माजी पोलीस पाटील मुरूमगाव, मथनुराम मलिया ग्रामपंचायत उपसरपंच मुरूमगाव, अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत सदस्य मुरूम गाव ,राजू कोठवार ग्रामपंचायत सदस्य मुरूम गाव, रामलाल मार्गीया प्रतिष्ठित नागरिक खेडेगाव ,जयलाल मार्गीया माजी पंचायत समिती सदस्य धानोरा, मुकेश मेश्राम बेलगाव, महेश कोठवार खेडेगाव, तिवारी भोयर ग्रामपंचायत सदस्य मुरूम गाव, कवळसिंग राणा ग्रामपंचायत सदस्य हीरंगे ,निरंगशाहा मडावी, चावणशा मडावी, मुरूम गाव भूपेंद्र शाहू मडावी व मुरूमगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते