धानोरा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
धानोरा, दि. ५/१२/२०२२
स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारा जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.किरमिरे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील श्रीमती वाळके मॅडम यांनी विशेष उपस्थिती म्हणून स्थान भूषविले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर किरमिरे सर यांनी एड्स या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना एड्स या आजाराबद्दल मार्गदर्शन केले तर ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील श्रीमती वाळके मॅडम यांनी एड्स या रोगाचा फैलाव व त्यावर घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर विस्तृत मार्गदर्शन केले . डॉ लांजेवार सर यानी याप्रसंगी एड्स या विषयावर आपल्या मार्गदर्शनातून घ्यावयाची काळजी यावर मार्मिक विवेचन केले यावेळी महाविद्यालयातील डॉ चुधरी डॉ वाघ डॉ धवनकर डॉ गोहणे प्रा भैसारे प्रा तोंडरे डॉ पठाडे डॉ जम्बेवार कार्यक्रमाला उपस्थित होते . डॉ प्रियंका पठाडे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर आभार प्राध्यापक वाळके यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते