चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि. ५/१२/२०२२
तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक नुकतीच पार पडली होती त्यात अतुल गण्यारपवार गटाचे सर्वच उमेदवार अविरोध निवडून आले होते. अध्यक्षपदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार तर उपाध्यक्षपदी मुरलीधर बुरे यांची अविरोध निवड करण्यात आली.
तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक सन 2022-2023ते 2027-28 या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार, अमोल गणारपवार, निलेश चूधरी, महादेव पिपरे, शामराव पोरटे, नामदेव किनेकर,वामन गौरकार, अरुण बंडावार, अरुण लाकडे, मुरलीधर बुरे,साईनाथ पेशेट्टीवार, मंजुषा चलकलवार, मालताबाई धोती आधी हे सर्व. तेराही उमेदवार अविरोध निवडून आले होते. आज ५डिसेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांची अध्यक्षपदी तर मुरलीधर बुरे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून एल. एस.रंधये व सहाय्यक म्हणून निवाने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बंडूजी रामटेके, विलास घोंगडे, विनायक पोर्टे, गुरुदास चौधरी, किरण कोवासे सुरेश मडावी,धांडू सिडाम, गुलाब सिंग धोती, बाबुराव बकाले, वामन गौरकार, सुधाकर निखाडे, वासुदेव दिवसे, राजू आत्राम, नामदेव किनेकर, गणपती भंडारे, यमाजी कोडापे, डिवरू बोधलकर, वामन कारडे,संजय मंडळ, रामजी नरोटे, मधुकर चिंतलवार आदी उपस्थित होते.