चामोर्शी लालडोगरी येथे श्री दत्त जंयती उत्सव

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी, दि.७/१२/२०२२

श्री दत्त जंयती निमित्याने मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतातील श्री दत्त व नागमदिरात दोन दिवसीय उत्सवात ढोलतासे ,श्री दत्ताची पालखी , कलश यात्रा , श्री दात्ताचे गाणे , व राम नामाच्या गर्जराने अवघी चामोर्शी नगरी दुमदुमून गेली .
श्री दत्त मदिर लालडोगरी येथून कलश यात्रा व पायी पालखी भजनाच्या गर्जरात काढण्यात येथून ती शिवाजी हायस्कूल , बाजार समिती , शिवाजी चौक ते चांभारपूरा येथील नाथाचे माहेर येथुन फिरवून परत श्री दत्त व नागमदिर येथे पालखाचा समारोप करण्यात आला.
मदिरात भजन , पुजाआच्या , श्री दत्ताचा पाळणा , गोपाल काला व शेवटी भाविक भक्तानामहाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी पालखीत मधुकर महाराज बोदलकर , माजी सरपंच मालन बोदलकर , न. प . चे उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , माजी ग्रां. प . सदस्य सुनंदा ढाक , विलास कुकडे , होमदेव गडकर , मेघराज वालदे , चोखाजी पिपरे , दिपक गडकर , धनराज गव्हारे , नितेश पिपरे , यमाजी पिपरे , नदाजी मांडवगडे , मारोती भांडेकर ; राजु घोगडे , शेषान बारसागडे , सुकदेव गव्हारे , पुजाराम महागमवार , किशोर बोदलकर , सुकदेव कुनघाडकर , संदिप बोदलकर , अशोक नवले , बाळा गडकर , वासुदेव पिपरे , गणपती किरमे , मारोती बोदलकर व मोठ्या सख्येने भाविक भक्त उपस्थित होते . मोठ्या सख्येने भाविकभक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.