गडचिरोली शहरातील नव्याने आलेला वाढीव गृहकर रद्द करा – रुपेश वलके, रायुका विधानसभा अध्यक्ष, गडचिरोली

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

गडचिरोली, दि.८/१२/२०२२

गडचिरोली शहरामध्ये नव्याने देण्यात आलेले वाढीव गृहकर रद्द करून जुनी कर पद्धती लागू करण्यात यावे यासाठी रुपेश वलके यांनी निवेदन दिले आहे .
नव्याने वाढविण्यात आलेले गृहकर अनेक गडचिरोली रहीवाशी यांना मान्य नसल्याने गडचिरोली शहरात नव्याने पुर्णमोजनी करुन तातडीने चौकशीचे आदेश देण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे .

तसेच गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावर असलेल्या आठवडी बाजार मधील नव्याने काढण्यात आलेले दुकानगाळे आणि इलेक्ट्रीक लाईट पोल तत्काळ सुरु करण्यात यावे,लांजेडा येथील तलाव मध्ये मंजुरीस्थित असलेले बागबगीच्या उद्यानाला येत्या महीन्याभरात मंजुरी देण्यात यावी, गडचिरोली शहराला लगत असलेल्या लांझेडा, स्नेहनगर, रामनगर, कारमेल मागील परीसर, साईनगर या नगरांचा विचार करून स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाकीला मंजुरी देण्यात यावी, गडचिरोली शहरामधील एकुण असलेल्या 27 वार्डमध्ये सीमेंट रोड तथा नाली बांधकामाची कामे जलद गतीने करण्यात यावी, गडचिरोली शहरामध्ये मागील वर्षी करण्यात आलेल्या गटर पाईपलाईन लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, गडचिरोली शहरातील एकूण 27 वार्ड मधील ओपनस्पेसची कामे जलद गतीने करण्यात यावी, गडचिरोली शहराला लागून असलेल्या सर्व तलावामधील असलेला गाळ आणि कचरा साफ करुन तलावाचे जलशुध्दीकरण करून सौदयकरण गडचिरोली नगर परिषदेमार्फत करण्यात यावे, गडचिरोली नगर परिषद हद्दीमधील असलेले नगर परिषदेचे दुकान गाळे हे सुशिक्षित बेरोजगाराना देण्यात आले होत पण ते दुकान गाळे भाडे तत्वावर उच्च् भु लोकांना भाडेत्तवार देण्यात आल्याने गडचिरोलीत असलेल्या खच्या असलेल्या बेरोजगारावर अन्याय झाले असल्याने याची तातडीने चौकशी करून योग्य न्याय करावा, लांझेंडा मधील असलेले अर्धवट रोड आणि नालीचे बांधकाम तातडीने पुर्णत्वास करण्यात यावे तसेच इंदिरा नगर, राम नगर कार्मेल शाळेमागील परिसर भातगिरणी परिसरातील सिमेंट कांक्रीट रोड बांधकाम तसेच अंडर ग्राउंड नालीचे बांधकमास मंजुरी देण्यात यावे. तसेच गडचिरोली शहरामध्ये बांधण्यात आलेल्या गटार पाईप लाईनला मंजूर देण्यात यावी.

इत्यादी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे , तसेच येत्या महीन्याभरात गडचिरोली शहरामध्ये सद्या स्थितीत नव्याने देण्यात आलेल्या वाढीव गृहकर पध्दती रह करून जुनी कर पध्दती लागू न केल्यास येत्या 8 दिवसामध्ये नगर परीषद च्या गेटला ताला मारो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, यांनी दिला आहे,

निवेदन देतांना श्री वलके यांचेसोबत अक्षय मेश्राम, विनोद सहारे, हेमराज लांजेवार, विवेक कांबळे, सुरेश खोब्रागडे, मुझाहीद पठाण, दीपक नंदेश्वर, नामदेव येलमुलवार, बाबुलाल रामटेके, ओमप्रकाश मेटे, शकीलाताई पठाण, रुपालीताई वलके, शाहरुख पठाण, मनोज बेसरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.