श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज, दि. ९/१२/२०२२
महाराष्ट्रातिल वैद्यकिय क्षेञातिल ख्यातनाम एन के पी साळवे इंस्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्स नागपुरच्या वतिने आज दि ९ ला मेडिकल असोशियेशन देसाईगंज यांना अपातकालिन रुग्णांना वैद्यकिय सेवा व सुविधा पोहचविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले दररोज ची दगदग व धावपळीच्या जिवनात मानवी आरोग्याचे संतुलन बिघडले असुन यामुळे ह्र्दय रोग हार्ट अटैक व तत्सम बिमार्यांचे प्रमाण वाढले असुन अश्या रुग्णांचे काही क्षणात प्राण जाऊ शकते यावर प्राथमिक उपचार म्हनुण सि पी आर व बिएलएस उपचार पद्धतिने अश्या रुग्णांचे प्राण वाचविले जावु शकते यासाठी विदर्भातिल ख्यातनाम एन के पी साळवे इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायंस च्या वतिने एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन आर आर सिलेब्रेशन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणात डॉ अजय वाटवे डॉ हर्षल श्रिगिरीवार डॉ अंकिता टिकलवार यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी देसाईगंज मेडिकल असोशियेशन चे अध्यक्ष डॉ इंदरप्रित टुटेजा, डॉ गौरव सहारे, डॉ रवी मोटवानी, डॉ विनोद नाकाडे, डॉ कमल परसवानी, डॉ नागसेन भोवते, डॉ शम्मी द्न्यानेश्वर पगाडे, अर्जुन स्वर्णकार यांचेसह वैद्यकिय क्षेञातिल गनमाण्य व्यक्ती उपस्थित होते .